हयातीचा दाखला पोस्टातून काढण्याची सुविधा
छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका)- पेन्शन धारकांना आपले हयात प्रमाणपत्र नोव्हेंबर महिन्यात द्यावे लागते. त्यासाठी पेन्शन कल्याण विभाग आणि पोस्ट विभाग यांच्यावतीने बायोमेट्रिक प्रणालीद्वारे पोस्टमन किंवा शाखा डाकपाल मार्फत हे प्रमाणपत्र काढता येते. पोस्टमन किंवा शाखा डाकपाल ही सुविधा अगदी घरपोहोचही देऊ शकतात. तरी विभागातील पेन्शनधारकांनी आपले हयात प्रमाणपत्र पोस्टातून काढावे असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment