विधानसभा निवडणूक २०२४: ११०-पैठण, १११- गंगापूर, ११२-वैजापूर च्या निरीक्षकांची नागरिकांना भेटण्याची वेळ व ठिकाण
छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ११०-पैठण, १११-गंगापूर, ११२-वैजापूर विधानसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक उज्ज्वलकुमारसिंग(भा.प्र.से.) हे दाखल झाले आहेत. त्यांचे निवास व संपर्क क्रमांक याप्रमाणे-
श्री. उज्ज्वलकुमारसिंग(भा.प्र.से.)
निवास- सुभेदारी विश्रामगृह ॲनेक्स बिल्डींग पेनगंगा कक्ष. मोबाईल क्रमांक-७०२८७५२५४८.
भेटीची वेळ-सकाळी साडेदहा ते साडेअकरा.
सामान्य नागरिक, मतदार वरील वेळी व ठिकाणी
निरीक्षक महोदयांना भेटू शकतात.
नागरिकांनी आपल्या तक्रारींसाठी निवडणूक निरीक्षकांना त्यांनी दिलेल्या वेळेत
भेटून आपले शंकानिरसन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
०००००
Comments
Post a Comment