अखेरच्या ७२ तासांत राबवावयाच्या कायदा सुव्यवस्था उपाययोजनांचा आढावा

 





छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- विधानसभा निवडणूक प्रचार कालावधी दि.१८ रोजी सायंकाळी ६ वा. संपणार आहे. त्यानंतर दि.२० रोजी मतदान होणार आहे. त्याआधी ७२ तासांत कायदा सुव्यवस्था अबाधित राखून मतदारांना निर्भय वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रमाणित कार्य उपाययोजनांचा आढावा आज घेण्यात आला.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आज यासंदर्भात बैठक झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवडणूक निरीक्षक बिद्यानंद सिंग (१०४-सिल्लोड, १०५- कन्नड), तलत परवेज(१०६-फुलंब्री,१०७-औरंगाबाद मध्य),    श्रीमती कोर्रा लक्ष्मी (१०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व), उज्ज्वलकुमार सिंग (११०-पैठण, १११- गंगापूर, ११२ वैजापूर), निरीक्षक(पोलीस) राजपालसिंग (भा.पो. से.), निरीक्षक(खर्च) कोटापट्टी वाम्शी क्रिष्णा  व सोभान सुत्रधार , उपजिल्हा निवडणूक अधिकारी  देवेंद्र कटके तसेच केंद्रीय सुरक्षा बलाच्या तुकड्यांचे अधिकारी उपस्थित होते.

            अखेरच्या ७२ तासांत वाहनांची तपासणी, छुप्या पद्धतीने केले जाणारे प्रचार, मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे प्रकार, त्यासाठी केले जाणारे प्रयत्न  अशा घटनांची तात्काळ दखल घेणे. तपासण्यात जप्त केलेला मुद्देमाल, तो संबंधित यंत्रणेकडे जमा करणे इ. बाबत सुचना निर्देश देण्यात आले. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून मतदारांना मतदानासाठी सुरक्षित आणि निर्भय वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश देण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा