आचारसंहिता कालावधीत २९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त तर ३ लाखांहून अधिक वाहनांची तपासणी

 छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका)- जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरु आहे. विविध तपासणी व जप्ती कारवाईत आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत  २९ कोटी १४ लक्ष २४ हजार रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती करण्यात आली असून तब्बल ३ लाख १७ हजार ९३९ वाहनांची तपासणी केली आहे, अशी माहिती आचारसंहिता कक्षातून मिळाली आहे.

            जिल्ह्यात गेल्या २४ तासात स्थिर सर्व्हेक्षण पथकांमार्फत करण्यात आलेल्या वाहन तपासणीचा तपशिल याप्रमाणे- राजकीय पक्षांची वाहने ३८४, खाजगी वाहने १७ हजार ५, सार्वजनिक वाहने ४९३, शासकीय वाहने १७५, पोलीस यंत्रणेची वाहने ९२, रुग्ण्वाहिका व अत्यावश्यक सेवेची वाहने ८३, वैद्यकीय विभागाची वाहने ४४, बॅंकांची वाहने २४ अशी एकूण १८ हजार ३०० वाहने तपासण्यात आली आहेत. तर आचारसंहिता सुरु झाल्यापासून आजतागायत ३ लाख १७ हजार ९३९ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्याच बरोबर भरारी पथकांनीही १७८५ वाहनांची तपासणी केली आहे. तसेच २८२ ठिकाणी अचानक भेटी दिल्या आहेत.

            जप्तीच्या कारवाईत जिल्ह्यात आतापर्यंत ६ कोटी २३ लाख ८१ हजार रुपयांची रोकड जप्ती झाली आहे. तसेच ५५ हजार २११.६२ लिटर्स दारु (किंमत १ कोटी ४६ लाख १४ हजार रुपये), १ कोटी ४ लक्ष ५३ हजार रुपयांचे अमली पदार्थ,  १८ कोटी ४२ लक्ष ३६ हजार रुपयांचे मौल्यवान धातू, १ कोटी ९६ लक्ष ५३ हजार रुपयांचे भेट वस्तू असा एकूण २९ कोटी १४ लक्ष २४ हजार रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती करण्यात आली आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा