मतदानासाठी भरपगारी सुटी
छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ साठी बुधवार दि.२० रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत मतदान करता यावे व मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भर पगारी सुटी देण्यात यावी,असे आवाहन कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत यांनी केले आहे.
निवडणूक
होत असलेल्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी हे जर कामानिमित्त
निवडणूक क्षेत्राबाहेर असले तरी त्यांना भरपगारी सुटी द्यावी. उद्योग विभागाअंतर्गत
येणारे उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना ही सुटी लागू राहिल. अपवादात्मक
स्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास मतदारांना किमान दोन तासांची सवलत देण्यात
यावी याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घ्यावी. मतदानासाठी सुटी मिळण्यासंदर्भात उद्भवणाऱ्या
तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कामगार उपआयुक्त यांच्या कार्यालयात तक्रार निवारण कक्ष
स्थापन करण्यात आला असून संबंधित कामगार, संघटना यांनी ०२४०-२३३४६०३ या क्रमांकावर
संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment