विधानसभा निवडणूक २०२४ :१०६-फुलंब्री, १०७- औरंगाबाद (मध्य) च्या निरीक्षकांची नागरिकांना भेटण्याची वेळ व ठिकाण
छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १०६-फुलंब्री,१०७-औरंगाबाद (मध्य) या विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक तलत परवेज(भा.प्र. से.) दाखल झाले आहेत. त्यांचे निवास व संपर्क क्रमांक याप्रमाणे-
श्री. तलत परवेज(भा.प्र. से.) निवास- सुभेदारी विश्रामगृह
मुख्य इमारत मांजरा कक्ष, मोबाईल क्रमांक-७३८५७१४९४३. ई-मेल- generalobserver61@gmail.com
, भेटीची वेळ- सकाळी ९ ते ११ वा.
सामान्य नागरिक,
मतदार वरील वेळी व ठिकाणी निरीक्षक महोदयांना भेटू शकतात. नागरिकांनी आपल्या तक्रारींसाठी निवडणूक निरीक्षकांना त्यांनी
दिलेल्या वेळेत भेटून आपले शंकानिरसन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
०००००
Comments
Post a Comment