पत्रपरिषद : आचारसंहिता अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज; १ कोटी ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त- विकास मीना
छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):- जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहिता अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करुन त्यामार्फत कारवाई करणे सुरु आहे. आतापर्यंत केलेल्या विविध कारवायांमध्ये १ कोटी ८५लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,अशी माहिती आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली.
विधानसभा
निवडणूक २०२४च्या अनुषंगाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. पत्रकार परिषदेस
आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
विकास मीना, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी संबोधित केले.
पत्रकार
परिषदेत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात छाननीअंती एकूण ३९७ उमेदवारांचे अर्ज होते.
त्यातून २१४ जणांनी माघार घेतल्याने आता जिल्ह्यात १८३ उमेदवार निवडणूक रिंगणात
आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय निवडणूक रिंगणातील उमेदवार संख्या याप्रमाणे- १०४- सिल्लोड-२४,
१०५- कन्नड-१६, १०६-फुलंब्री-२७, १०७- औरंगाबाद(मध्य)-२४, १०८-औरंगाबाद(पश्चिम)-१८,
१०९-औरंगाबाद(पूर्व)-२९, ११०-पैठण-१७, १११- गंगापूर-१८, ११२-वैजापूर-१०. प्रत्येक
विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख़्या लक्षात घेता फक्त
एका म्हणजेच वैजापूर मतदार संघात एक मतदान यंत्र लागणार आहे. उर्वरित आठही
मतदारसंघात २ मतदान यंत्रे लागणार आहेत. ते पाहता आता आवश्यक असलेल्या मतदान
यंत्रांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता
एकूण ७४३० मतदान यंत्रांची आवश्यकता आहे. त्यासाठीचे प्रशासनाचे नियोजन झाले असून
अतिरिक्त मतदान यंत्रे जिल्ह्यात उपलब्ध आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
आचारसंहिता
कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी
सांगितले की, जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी ३६ फिरते निरीक्षण पथके, ४१
स्थिर निरीक्षण पथके, ४६ व्हिडीओ निरीक्षण पथके व १६ व्हिडीओ पाहणी पथके नेमण्यात
आले आहेत. सीव्हिजील ॲपद्वारे आतापर्यंत ६८ तक्रारी प्राप्त झाल्यासून एका
तक्रारीचे सरासरी ५६ मिनीटात निराकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत
करण्यात आलेल्या कारवाईत १२ लाख रुपयांची
रोकड जप्त करण्यात आली आहे. तर १५ हजार
२८७.९३ लिटर्स मद्य ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत २९ लाख ९९ हजार रुपये असून ७९ लाख
४५ हजार रुपयांचे अंमली पदार्थ , ५५ हजार रुपयांचे मौल्यवान धातू, ६३ लाख ८७ हजार
रुपयांचे अन्य भेटवस्तू असे एकूण १ कोटी ८५ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले
आहे.
०००००



Comments
Post a Comment