विधानसभा निवडणूक २०२४ : १०८-औरंगाबाद (पश्चिम), १०९- औरंगाबाद (पूर्व)च्या निरीक्षकांची नागरिकांना भेटण्याची वेळ व ठिकाण
छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघाच्या भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निरीक्षक श्रीमती कोर्रा लक्ष्मी या दाखल झाल्या आहेत. त्यांचे निवास व संपर्क क्रमांक याप्रमाणे-
श्रीमती कोर्रा लक्ष्मी (भा.प्र.से.)
निवास- सुभेदारी विश्रामगृह मुख्य इमारत तेरणा
कक्ष,
मोबाईल क्रमांक-७३८७७१४९४३. भेटीची
वेळ-सकाळी १० ते ११ वा. दरम्यान.
सामान्य नागरिक,
मतदार वरील वेळी व ठिकाणी निरीक्षक महोदयांना भेटू शकतात. नागरिकांनी आपल्या तक्रारींसाठी निवडणूक निरीक्षकांना त्यांनी
दिलेल्या वेळेत भेटून आपले शंकानिरसन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
०००००
Comments
Post a Comment