जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची शनिवारी (दि.१६) ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखत
मुंबई, दि.१४: राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. बुधवार दि.२० रोजी मतदान तर शनिवार दि.२३ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची ही निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगामार्फत काटकोरपणे तयारी करण्यात आली असून जिल्हास्तरावर यंत्रणा सज्ज झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणेच्या तयारीची माहिती जनतेला व्हावी या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण होणार आहे.
‘दिलखुलास’
हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी
७ वा. २५ मि. नी प्रसारित होतो. याच विशेष मुलाखतींच्या श्रृंखलेत शनिवार दि.१६ रोजी
सकाळी ७ वा. २५ मि. नी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची
मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत समरजीत ठाकूर यांनी घेतली आहे.
०००००

Comments
Post a Comment