स्थिर सर्व्हेक्षण पथकाची कारवाई; १९ किलो सोने व ३७ किलो चांदी जप्त

 छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका)- आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने १०४- सिल्लोड मतदार संघात निल्लोड फाटा येथे  १९ किलो सोने व ३७ किलो चांदी जप्त करण्यात आली. एका खाजगी वाहनातून ही वाहतुक होत होती. जप्त केलेल्या ऐवजाची किंमत अंदाजे १९ कोटी रुपयांची आहे,असे आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळविले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी  जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत आचारसंहिता अंमलबजावणीसाठी स्थिर सर्व्हेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. गुरुवारी (दि.१४) रोजी १०४ सिल्लोड मतदार संघात छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर निल्लोड फाटा येथे  जळगावकडे जात असलेल्या एमएच १२ व्हीटी ८६२९ या वाहनाची तपासणी केली असता त्यात १९ किलो सोने व ३७ किलो चांदीची वाहतुक होत असल्याचे आढळून आले. हा ऐवज जप्त करण्यात आला असून  त्याची अंदाजे किंमत १९ कोटी रुपये आहे. हा ऐवज व वाहन सिटी पोलीस स्टेशन सिल्लोड यांना सुपूर्द करण्यात आला असून  पुढील कारवाई वस्तू व सेवा कर विभागामार्फत करण्यात येत आहे,असे सहाय्यक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा