मतदार चिठ्ठी वाटप सुरु

 छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघात मतदार चिठ्ठी (Voter Information Slip) चे वाटप सुरु करण्यात आले आहे, असे मतदार यादी कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी कळविले आहे.

मतदानाच्या दिवशी मतदारांना आपले नाव मतदार यादीत शोधणे, त्याप्रमाणे आपले मतदान केंद्र शोधणे सोपे व सुलभ व्हावे या करीता भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार चिठ्ठ्या उपलब्ध करुन दिल्या जातात. ह्या चिठ्ठ्या मतदारांपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत पोहोचविल्या जातात. हे काम रविवार दि.१० पासून सुरु झाले आहे. मतदारांनी आपापल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क समन्वय साधून आपली मतदार चिठ्ठी प्राप्त करुन घ्यावी व दि.२० रोजी आपला मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा