विशेष निरीक्षक मिश्रा यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

 




छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका)- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक २०२४ करिता महाराष्ट्र राज्यासाठी नियुक्त केलेले विशेष निरीक्षक (सामान्य) राम मोहन मिश्रा यांनी आज जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी तथा  जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, निवडणूक निरीक्षक बिद्यानंद सिंग (१०४-सिल्लोड, १०५- कन्नड), तलत परवेज(१०६-फुलंब्री,१०७-औरंगाबाद मध्य),    श्रीमती कोर्रा लक्ष्मी (१०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व), उज्ज्वलकुमार सिंग (११०-पैठण, १११- गंगापूर, ११२ वैजापूर), निरीक्षक(पोलीस) राजपालसिंग (भा.पो. से.),उपजिल्हा निवडणूक अधिकारी  देवेंद्र कटके आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूकीच्या अनुषंगाने होत असलेल्या तयारीची माहिती दिली. मतदारसंघनिहाय मतदान केंद्र, मतदार यादी, मतदार चिठ्ठी वाटप, निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान केंद्रावर द्यावयाच्या व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था उपाययोजना, मतदार जनजागृतीसाठी राबविलेले उपक्रम याबाबत माहिती देण्यात आली. श्री. मिश्रा यांनी सांगितले की, जसजसा निवडणूकीचा दिवस जवळ येईल त्यानुसार आता नियुक्त केलेल्या विविध सर्व्हेक्षण पथकांमार्फत तपासण्या सुरु ठेवा. आचारसंहिता पालनाबाबत अधिक दक्षता घ्यावी. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदाराला मतदान केंद्रांवर मतदान करणे सहज सुलभ व्हावे यावर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. मतदार जनजागृतीवर भर द्यावा अशा सुचना केल्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा