सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी नाविन्यपूर्ण व्यवसायांचा अंगिकार आवश्यक- केंद्रीय सहसचिव पंकजकुमार बन्सल
छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)- केंद्रशासनाच्या ‘सहकारातून समृद्धी’ या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार सहकार चळवळ बळकट करण्यासाठी आधुनिकीकरण व नाविन्यपूर्ण व्यवसायांचा अंगिकार करणे आवश्यक आहे. त्याकरीता जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे अद्यावतीकरण करावे,असे निर्देश सहकार विभागाचे केंद्रीय सहसचिव पंकजकुमार बन्सल यांनी आज दिले.
केंद्रीय
सहसचिवांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस एन.सी.डी.सी.चे अधिकारी विनित नारायण, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर,
विभागीय सह निबंधक शर्द जरे, नाबार्डचे क्षेत्रिय व्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा
उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश
केदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, सहा. आयुक्त अन्न व औषध
प्रशासन शा. ना. साळे, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी मनिषा हराळ मोरे, वीज वितरण
कंपनीचे संदीप दरवडे, जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी मधुरिमा जाधव, जिल्हा
मध्यवर्ती बॅंकेचे अजय मोटे तसेच अन्य विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सहकार विभागांतर्गत येणाऱ्या
केंद्रीय योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात नवीन विविध कार्यकारी सेवा
सोसायट्या स्थापन करणे, विविध कार्यकारी सेवा संस्थांनी नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरु
करणे. डेअरी, मत्स्य व्यवसाय, जनऔषधी केंद्र, धान्य गोदामे, खते-बि-बियाणे, पेट्रोल
पंप इ. गोदाम बांधकामांसाठी प्रस्ताव तयार करणे, आपले सेवा केंद्र सारखे सेवा
केंद्र सुरु करणे. धान्य खरेदी केंद्र सुरु करता यावे यासाठी विविध तांत्रिक
बाबींची पूर्तता करणे अशा विविध विषयांबाबत आढावा घेण्यात आला. तसेच जिल्ह्यात
सहकारी संस्थांमार्फत करता येण्यासारख्या मत्स्य व्यवसाय, दूध संकलन केंद्र, दाळ
प्रक्रिया व्यवसाय अशा विविध व्यवसायांच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. तसेच
सहकारी संस्थांचे संगणकिकरण करुन त्यांचे अद्यावतीकरण करण्याबाबतही आढावा घेण्यात
आला.
०००००





Comments
Post a Comment