जिल्हाधिकारी कार्यालयात आधार प्रमाणिकरण प्रशिक्षण

 



छत्रपती संभाजीनगर,दि.१९ (जिमाका):-  जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे आधार प्रमाणीकरण करणारे  ऑपरेटर व सुपरवायझर यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. शनिवारी (दि.१४)प्रशिक्षण पार पडले. पोस्ट विभाग, पुरवठा विभाग, बँक तसेच CSC केंद्रामार्फत आधार प्रमाणिकरण सेवा देणाऱ्या १२०आधार ऑपरेटर व सुपरवायझर यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर हे याप्रसंगी उपस्थित होते. मुंबई प्रादेशिक आधार कार्यालयाचे मुख्य अधिकारी गणेश एच, मास्टर ट्रेनर श्रीमती कीर्ती मदलाणी तसेच प्रकल्प अधिकारी महेश शिंदे  उपस्थित होते. श्रीमती कीर्ती मदलाणी यांनी आधार ऑपरेटर व सुपरवायजर यांना आधार प्रमाणीकरण करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी समजून घेवून व त्यावर उपाय सुचविले.तसेच आधार प्रमाणीकरण करतांना घ्यावायची काळजी  सुलभता याबाबत मार्गदर्शन केले. यात कोणतीही हयगय केल्यास दंड आणि शिक्षेच्या तरतुदींचीही माहिती दिली. आधार प्रमाणिकरण अतिशय संवेदनशील सेवा असून आधार नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी महेश शिंदे यांनी दिल्या. माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रकल्प अधिकारी महेश गोळे यांनी यथोचित मार्गदर्शन केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा