जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा
छत्रपती संभाजीनगर,दि.१०(जिमाका)- जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ चा आढावा आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व यंत्रणाप्रमुख आदी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्हा वार्षिक
योजना सर्वसाधारण सन २०२३-२४ अंतर्गत मंजूर कामांची सद्यस्थिती, आवश्यक दायित्व
निधीचे मागणी प्रस्ताव , १० डिसेंबर अखेर खर्चाची स्थिती, मंजूर कामांची माहिती,
अखर्चित निधीचा तपशील तसेच सन २०२५-२६
करीता प्रारुप आराखडा यामुद्यांबाबत आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हा विकास आराखडा
तयार करण्यासाठी विभागनिहाय प्रस्ताव तयार करणे याबाबतही आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी कामे वेळेत व परस्पर समन्वयाने
करावीत. वितरीत निधी वेळेत खर्च करतांना कामांचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राखण्याची
दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्व यंत्रणांना दिले.
०००००




Comments
Post a Comment