‘जलजीवन मिशन’ची कामे समन्वयाने करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 





छत्रपती संभाजीनगर,दि.९(जिमाका)- हर घर नल से जल उपलब्ध करुन देण्यासाठी जल जीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यात ११६४ कामे सुरु करण्यात आली असून ६३५ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज यंत्रणांना दिले.

            जलजीवन मिशन संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, कार्यकारी अभियंता वाघमारे, तसेच सर्व यंत्रणा प्रमुखआदी उपस्थित होते.  

            जिल्ह्यातील जलजीवन मिशन संदर्भातील कामांचा आज आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात जलजीवन मिशनची ११६४ कामे सुरु करण्यात आली. त्यापैकी ६३५ कामांची भौतिक प्रगती झाली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली आहे. तथापि, उर्वरित कामे मात्र किरकोळ तांत्रिक सोपस्कारांअभावी प्रलंबित दिसत आहेत. त्यासाठी आवश्यक ना- हरकत पत्रे, दाखले इ. ची पूर्तता करुन कामांची पूर्तता करुन घ्यावी. त्यासाठी सर्व विभागांनी आपापसात समन्वय राखावा,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण, ग्रामविकास विभाग इ. विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा