अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करून माहिती ऑनलाइन करण्याचे महिला व बालविकास विभागाचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका):- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालयामध्ये ज्या आस्थापनेवर दहा किंवा दहापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करून याबाबतची माहिती ऑनलाईन करावी,असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.

               समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिला अध्यक्ष, तसेच महिलांच्या प्रश्नांशी बांधीलकी असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव व कायद्याचे ज्ञान आहे, अशा कर्मचाऱ्यांमधून किमान दोन सदस्य, तसेच अशासकीय संघटना किंवा लैंगिक छळाशी संबंधित प्रश्नांशी परिचित असलेल्या व्यक्ती यामधील एक सदस्य असावा, समितीमध्ये किमान ५० टक्के सदस्य महिला राहतील व समितीचा कार्यकाल हा तीन वर्षाचा राहील.

            शासनस्तरावर अंतर्गत तक्रार समितीची माहिती ऑनलाईन अपडेट करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, कार्यालय पत्ता:- प्लॅाट नंबर- ९ श्री. जाधव, यांची इमारत खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्यक्ष किंवा ई-मेल आयडी dist.womenc@yahoo.com वर तात्काळ सादर करावी. ज्या कार्यालयामध्ये/ आस्थापनेवर दहापेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनी स्थानिक तक्रार समिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.एन. चिमंद्रे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा