थंडीपासून बचावासाठी उपाययोजना; आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सुचना जारी
छत्रपती संभाजीनगर,दि.४(जिमाका)- जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. १० अंश सेल्सियस पेक्षाही कमी तापमानाची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपला व आपल्या कुटुंबियांचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने सुचना जारी करण्यात आल्या आहेत. या सुचनांची अंमलबजावणी करुन नागरिकांनी आपला व आपल्या कुटुंबियांचा थंडीपासून बचाव करावा,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खिरोळकर यांनी केले आहे.
१. घरातील लहान मुले व
वृद्धांची विशेष काळजी घ्यावी.
२. नियमित गरम पेय प्यावे.
३. कोरडे रहावे. ओले असल्यास
त्वरीत कपडे बदलून घ्यावे. जेणेकरुन उष्णता कमी होणार नाही.
४. थंडीचे कपडे परिधान करावे.
पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे परिधान करावे. नाक, कान, छाती यांचे संरक्षण होईल
असे कपडे परिधान करावे.
५. आपत्कालिन परिस्थिती
आवश्यक वस्तूंचा साठा घरात ठेवावा.
६. थंडीचे प्रमाण वाढल्यास
शक्यतो घरात थांबा. थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी शक्यतो प्रवास टाळा.
७. हातमोज्यांऐवजी संपूर्ण
हात झाकले जातील असे कपडे वा हातमोजे वापरा. त्यामुळे जास्त गरम वाटून थंडीपासून
बचाव होतो.
८. मद्यपान करु नका, त्यामुळे
शरिराचे तापमान कमी होते.
९. थंडीमुळे पाण्याच्या
पाईपात पाणी गोठू शकते. त्यामुळे घरात पुरेसे पाणी साठवा.
१०. थंडीमुळे हुडहुडी भरली
असेल तर दुर्लक्ष करु नका. शरिराचे तापमान कमी होण्याचे हे पहिले लक्षण आहे.
तात्काळ बंदिस्त जागेत आश्रयाला जा.
११. शरिराचा भाग मऊ पडणे,
बोटांवर, पायाच्या टोकाला, कानाच्या पाळ्याला , नाकाच्या शेंडावर निस्तेजपणा
पांढरटपणा जाणवणे अशा लक्षणांकडे लक्ष
द्या व प्रतिबंधात्मक उपाय करुन तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.
१२. तब्येतीवर लक्ष ठेवा व
तात्काळ वैद्यकीय सेवा मिळवा.
१३. माध्यमांमधून हवामान विषयक
माहिती मिळवत रहा व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करा.
०००००
Comments
Post a Comment