अल्पसंख्याक समाजाने सर्वांगिण विकासासाठी शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावा- उपजिल्हाधिकारी संगिता राठोड

 




छत्रपती संभाजीनगर, दि.१९ (जिमाका):- अल्पसंख्याक समुदायाच्या जीवनामध्ये  बदल सकारात्मक घडवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा उपयोग होतो. अल्पसंख्याक समाजाने आपल्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांनी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक अधिकार दिवस बुधवारी (दि. १८) पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजीत या कार्यक्रमास तहसिदार रुपा चित्रक, अल्पसंख्याक समुदायाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. फिरदोस फातिमा खान यांनी अल्पसंख्याक समुदायातील महिलांच्या शिक्षणाबाबत व या समुदायातील घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव जागृतीपर मार्गदर्शन केले. अजहर जब्बार पठाण यांनी अल्पसंखाक हिताच्या योजनेची माहिती दिली. शासकीय सेवेत अल्पसंख्याक समाजाचा टक्का वाढावा म्हणून शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करावे. मौलाना आझाद महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जहीर शेख यांनी महामंडळाद्वारे चालवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रबंधक डी.एल केदार, शिक्षणाधिकारी (योजना) च्या अरुण भूमकर यांनी त्याकडे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजनांची माहिती दिली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा