मनाई आदेश
छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका)- आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७ (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी हे आदेश निर्गमित केले असून दि.१८ डिसेंबर पर्यंत हे आदेश अमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment