ॲग्रीस्टॅक प्रकल्प सोमवार(दि.१६) पासून प्रत्येक गावात

 छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):-विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचवता यावा यासाठी कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजीटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रिस्टॅक(Digital Public Infrastructure for Agriculture) ही योजना राबविण्यात येत असून या योजनेचे काम सोमवार दि.१६ पासून प्रत्येक गावात सुरु करण्यात येत आहे. सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी दि.१६ ते दि.१८ या तीन दिवसांत आपापल्या गावात जाऊन गावनिहाय फार्मर आयडीची नोंदणी करावी,असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यात सोमवार दि.९ पासून प्रत्येक तालुक्यातील एक गाव याप्रमाणे काम करण्यात आले. त्याअनुभवाच्या आधारे आता सोमवार दि.१६ ते दि.१८ या कालावधीत प्रत्येक गावात फार्मर आयडी नोंदणी सुरु होईल. त्यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य व सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. यासंदर्भात केलेले नियोजन व झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सर्व पथकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावयाचा आहे,असेही खिरोळकर यांनी आदेशात म्हटले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा