सुशासन सप्ताहात ई-शिधापत्रिका, प्रमाणपत्र, दाखल्यांचे वाटप

 





    छत्रपती संभाजीनगर,दि.२४ (जिमाका):-             जिल्ह्यात दि.१९ ये २४ या कालावधीत ‘सुशासन सप्ताह’ साजरा करण्यात आला. ई- शिधापत्रिका, प्रमाणपत्रे व दाखल्यांचे वाटप या कालावधीत नागरिकांना करण्यात आले. सार्वजनिक सेवा वितरणामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे हे या सप्ताहाचे प्राथमिक उद्दिष्ट होते. या निमित्ताने प्रत्येक नागरिकाला आवश्यक प्रमाणपत्रे कोणत्याही अडचणीशिवाय मिळतील याची खात्री करणे साठी तसेच जागीच दाखले देण्याच्या सोयीसाठी जिल्हाभर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली. त्याचा अनेकांना लाभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात यानिमित्त (दि.२३ रोजी) आयोजित कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (जा.प्र.) एकनाथ बंगाळे, उपजिल्हाधिकारी(भूसंपादन) डॉ.सुचिता शिंदे, तहसिलदार सा.प्र श्रीमती रूपा चित्रक. तहसीलदार (महसूल)श्रीमती पल्लवी लिगदे, जिल्‍हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल थोरात, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. लाभार्थ्यांना ई- शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले तसेच संजय गांधी योजनेअंतर्गत गरजूंना प्रमाणपत्र वाटप करण्‍यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा