पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना; प्राप्त अर्जांची त्रुटी पूर्तता करणेबाबत आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका):- राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय व तंत्रनिकेतनांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वसतीगृह योजनेत विमुक्त जाती भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आली आहे. छाननीअंती त्रुटी असलेल्या मुलींच्या प्राप्त अर्जाची यादी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मुलींचे शासकीय वसतिगृह बी-५ ज्ञानपीठ कॅम्पस, बालभारती कार्यालयाजवळ, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर व मुलांच्या प्राप्त अर्जांची यादी मुलांचे शासकीय वसतिगृहज्ञानकॉम टेक्नो पार्क, गरवारे स्टेडियम समोर, सिडको छत्रपती संभाजीनगर येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अर्जांमधील त्रुटींची पुर्तता संबंधित विद्यार्थ्यांनी दि.२४ डिसेंबर पर्यंत करावी,असे आवाहन सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) अनंत कदम यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment