जी.डी.सी.ए.व सी.एच.एम.परीक्षा २०२४ चे निकाल घोषित
छत्रपती संभाजीनगर,दि.२४ (जिमाका):- सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, यांचे मार्फत जी.डी.सी.ए. व सी.एच.एम परीक्षा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. यापरीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. गुणपत्रके या कार्यालयास प्राप्त झाल्यावर प्रसिद्ध करण्यात येईल. निकाल संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वत:च्या लॉगिन वर उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे सन २०२२ व २०२३ च्या परिक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र अद्याप कार्यालयातून हस्तगत केले नाही. अशा विद्यार्थ्यांनी कार्यालयात समक्ष येऊन हस्तगत करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ.मुकेश एस.बाराहाते यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment