निर्यात प्रचालन कार्यशाळा सोमवारी (दि.२३)

 छत्रपती संभाजीनगर,दि.१९ (जिमाका):-  उद्योजक , निर्यातदार आणि व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर आणून  उत्पादीत मालाच्या निर्यातीस चालना देण्यासाठी सोमवर दि.२३ रोजी सकाळी ९ वा. एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे,असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळविले आहे. बजाज भवन, सीएमआयए सभागृह, प्लॉट नं.पी-२, रेल्वेस्टेशन  एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर येथे ही कार्यशाळा होणार आहे. उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे राहणार आहेत. या कार्यशाळेत निर्यात धोरण, प्रक्रिया, प्रोत्साहन , बॅंक प्रणाली व विदेशांशी व्यापार इ. विषयांवर अजय कोर्ला, मुकेश समतानी, सहदेव सातपुते, मौलिक मावानी, सुयोग भासे, अमोल मोहिते. स्वप्निल राठोड हे तज्ज्ञ व्यक्ति मार्गदर्श करणार आहेत.  कार्यशाळेस उपस्थितीचे आवाहन उद्योग विभागाचे सह संचालक बी.टी. यशवंते व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा