राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम; जोखमीतील ३७ हजार व्यक्तिंच्या प्रत्यक्ष तपासणीचे नियोजन
छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका):- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिम (कुसुम)अंतर्गत कुष्ठरुग्ण शोध मोहिम दि.१६ ते २० डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. जोखमीतील ३७ हजार व्यक्तिंची प्रत्यक्ष तपासणीचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कळविले आहे.
या मोहिमेचा प्रारंभ नागरी आरोग्य केंद्र पीरबाजार येथे सोमवारी (दि.१६) करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेच्या,सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ. शिवकुमार हलकुडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेरणा संकलेच्या, डॉ. तनवीर सिद्धकी , डॉ. अर्चना राणे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती विद्या सानप आदी उपस्थित होते.
३७ हजार व्यक्तिंच्या तपासणीचे
नियोजन
सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरुग्ण प्रसार
हे ध्येय्य साध्य करण्यासाठी समाजातील व्यक्तिंची
प्रत्यक्ष शारिरीक तपासणी करुन कुष्ठरुग्ण शोध मोहिम दि.१६ ते २० डिसेंबर या कालावधीत
होणार आहे. शास्वत विकास ध्येयाच्या अंतर्गत केंद्र शासनाने शुन्य कुष्ठरुग्ण प्रसार
हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी समाजातील नविन कुष्ठरुग्ण शोधुन त्यांना बहुविध
औषधोपचाराखाली आणणे आवश्यक आहे. या कालावधीत
जिल्ह्यात विटभट्टी कामगार,खाण कामगार,स्थलांतरीत व्यक्ती, बांधकाम मजूर, आश्रमशाळा,
वस्तीगृहात राहणारे विद्यार्थी तसेच कारागृहातील कैदी यांची प्रत्यक्ष शारीरीक तपासणी
करण्यात येणार आहे. आशा कार्यकर्ती व पुरुष स्वयंसेवक यांचे मदतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण
करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ३७ हजार व्यक्तिंची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात
आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धानोरकर यांनी सांगितले.
सूत्रसंचालन
डॉ. नाथराव फड यांनी केले. नागरिकांनी आपली
तपासणी करुन घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
लक्षणे दिसताच करा तपासणी
नागरिकांनी फिक्कट लालसर बधीर चट्टा. तेलकट गुळगुळीत चमकदार
त्वचा, कानाच्या जाड पाळ्या, दुखऱ्या मज्जातंतु,
हातापायाला मुंग्या येणे व अशक्तपणा येणे इ. लक्षणे दिसल्यास शासकीय रुग्णालयात
तपासणी करुन घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००

Comments
Post a Comment