एम.सी.ई.डी. मार्फत उद्योजकता विकास प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर,दि.१०(जिमाका)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि.१२ रोजी करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक – युवतींकरीता एक महिना कालावधीचे प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात व्यवसाय, मार्गदर्शन, व्यवसाय निवडीचे तंत्र, उद्योगाच्या विविध संधी, बाजारपेठ पाहणी, शासनाचे उद्योजकता विषयी धोरण, शासकीय योजनांची अनुदान विषयक संपूर्ण माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, सिद्धी प्रेरणा, प्रशिक्षण, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, विविध उद्योगांना भेटी, व्यवसायासाठी लागणारे परवाने, आयात – निर्यात क्षेत्रातील उद्योग संधी, डिजीटल मार्केटिंग, कर्जाची ऑनलाईन प्रक्रिया, कृषी माल प्रक्रिया उद्योग, अन्न व फळ प्रक्रिया उद्योग, प्लॅस्टिक व केमिकल उद्योग संधी, सोलर क्षेत्रातील उद्योगसंधी या सर्व विषयांवर तज्ज्ञ व्याख्यात्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन एमसीईडी विभागीय अधिकारी सुदाम थोटे, प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रतिभा निमकर यांनी केले आहे. दि.१२ पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी श्रीमती आशा कुरवाडे संपर्क क्रमांक ७८८८०८०४१९ व प्रत्यक्ष भेटीसाठी मुख्यालय महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) अ- ३८ एमआडीसी एरिया रेल्वे स्टेशन रोड येथे संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment