सोमवारी (दि.१६) महिला लोकशाही दिन

 छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजीत केला जातो. त्याअनुषंगाने सोमवार दि.१६ रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सकाळी ११ ते १२ या वेळात जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या महिला लोकशाही दिनात महिलांच्या तक्रारींची दखल घेतली जाते. त्यासाठी महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करावी. तक्रारी वैयक्तिक स्वरुपाची असावी, प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, सेवा व आस्थापनाविषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत. तरी महिलांनी या लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर.एन.चिमद्रे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा