‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम, दि.१ जानेवारीपासून
छत्रपती संभाजीनगर,दि.२४(जिमाका):- उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी, ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दरवर्षी दि.१ ते १५ जानेवारी दरम्यान राबविण्यात येतो. त्यानुसार शासकीय विभागीय ग्रंथालय, समर्थ नगर, छत्रपती संभाजीनगर येथे दि. १ ते १५ जानेवारी दरम्यान सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्त विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहिम सुद्धा राबविण्यात येणार आहे. शहर व जिल्हयातील नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment