एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश स्पर्धापरीक्षा २३ फेब्रुवारी रोजी
छत्रपती संभाजीनगर,दि.१०(जिमाका)- इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी स्पर्धा परीक्षा होणार आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दि. २५ जानेवारी २०२५ पर्यंत पाठवाव, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चेतना मोरे यांनी कळविले आहे.
अपर आयुक्त, आदिवासी
विकास, अमरावती यांचे अधिनस्त येत असलेल्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आादिवासी
विकास प्रकल्प, धारणी पांढरकवडा, किनवट, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुसद, कळमनुरी
यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या १२ जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा
जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासन
मान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता
५ वी, ६ वी, ७ वी व ८ वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी यास्पर्धा
परिक्षेसाठी पात्र राहतील. सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन
पत्र विद्यार्थ्यांकडून भरुन घेऊन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प कार्यालयाकडे सादर करावे. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय
आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
यांचेकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज दि.२५ जानेवारी २०२५ पर्यंत संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे
मुख्याध्यापकांमार्फत सादर करावे. असे एकात्मिक आदिवासी प्रकल्प, छत्रपती
संभाजीनगर चे प्रकल्प अधिकारी श्रीमती चेतना मोरे यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment