पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज (दि.२)पासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याच अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे गुरुवार दि.२ रोजी दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.३ रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे.
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात ही परिषद होणार असून सकाळी साडेदहा
वा. उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक
उर्जा मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, कुलगुरु डॉ. विजय
फुलारी तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी
राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खा. संदिपान भुमरे, खा.डॉ.
कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे. विधान सभा सदस्य
आ. अब्दुल सत्तार, आ. प्रशांत बंब, आ. प्रदीप जैस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ.
श्रीमती अनुराधा चव्हाण, आ. श्रीमती संजना जाधव, श्रीमंत अमरजीत राजे बारगळ यांची उपस्थिती राहील.
या दोन
दिवसीय परिषदेचे नियोजन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व मुख्यमंत्र्यांचे
अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी
केले आहे.
दोन
दिवस तज्ज्ञांचे मार्गदर्शन
दुपारी
१२ वा. ज्येष्ठ विचारवंत लेखक रविंद्र मुळे यांचे बीज भाषण होणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित इतिहासाचा मागोवा घेतला जाणार आहे.
पहिल्या
दिवशी पहिल्या सत्रात दुपारी साडेबारा वा. हिंदवी स्वराज्य ते हिंदवी
साम्राज्य या विषयावर सुधीर थोरात, दुपारी
३ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि महिला
सबलीकरण याविषयावर डॉ. नम्रता भोसले-मोहिते, दुपारी साडेतीन वा. रविंद्र सासमकर
यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी धार्मिक सांस्कृतिक पुनरुत्थान या विषयावर तर दुपारी
४ वा. डॉ. अशोक बांगर यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी एक कुशल प्रशासक या विषयावर
आपले विचार मांडतील. सायं. ५ ते ७ दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम होऊन पहिल्या दिवसाचे सत्र संपतील.
दुसऱ्या
दिवशी शुक्रवार दि.३ रोजी सकाळी ११ वा. डॉ.
श्रीमती योगिता होके पाटील व गोरक्षनाथ अबुज यांचे मार्गदर्शन, दुपारी १२ वा.
होळकर घराणे या विषयावर नवनाथ ढगे, दुपारी साडे १२ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर- कला आणि स्थापत्य या विषयावर रामभाऊ लांडे, दुपारी १ वा. पुण्यश्लोक
अहिल्यादेवी –सामाजिक समता याविषयावर डॉ. रमेश पांडव, दुपारी ३ वा. धनंजय धनगर हे
मुक्तमंथन करतील, दुपारी ४ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाट्य श्रीमती
अर्चना चितळे ह्या सादर करतील.
अभ्यासक,
इतिहास संशोधक व नागरीकांनी या दोन दिवसीय विव्दत परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक
सांस्कृतिक कार्य संचालनालय विभीषण चवरे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment