‘देश का प्रकृती परिक्षण’ अभियानअंतर्गत प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):- भारत सरकारच्या आयुष मंत्रालयामार्फत ‘देश का प्रकृती परिक्षण’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा उदेश, लोकांना त्यांची अव्दितीय प्रकृती समजुन घेण्यास मदत करणे आणि वैयक्तिकृत आरोग्य पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहीत करणे हा आहे. या अभियानातुन आयुर्वेदाला प्रत्येक घराजवळ आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब
कल्याण प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे (दि. २३.१२.२०२४ रोजी) प्रशिक्षण
देण्यात आले. उदघाटन प्राचार्य डॉ.संतोष कडले, व्यवस्थापक निदेशक डॉ. रेखा चाटे यांच्या
हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकिय अधिकरी डॉ. सुनंदा मदगे,डॉ. सविता तांबे-शेळके,
डॉ. विश्वास बामणीकर, सत्यभामा बोरडे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी नाडी तपासणी करुन
प्रकृती परिक्षण अॅप मध्ये त्यांची माहीती भरुन त्यांना परिक्षणा बाबत माहीती दिली.
प्रकृती परिक्षण म्हणजे आयुर्वेदात व्यक्तीच्या शारीरिक कार्यात्मक आणि वर्तुणुक वैशिष्ट्यावर
आधारीत तिची व्यक्तिरेखा किंवा मनोवैज्ञानिक स्वभाव जाणुन घेणे. प्रकृती ही आपल्या
शरीराची रचना असुन, ती अनुवंशिक पर्यावरणीय घटक, आईचे अन्न, जीवनशैली आणि प्रबळ दोषावर
अवलंबुन असते,असे डॉ. सविता तांबे यांनी सांगितले.
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी ज्ञानोबा
भोसले यांनी सर्व बहुउदेशिय आरोग्य सेवक प्रशिक्षणार्थी यांनी कार्यक्षेत्रात देश का
प्रकृती परिक्षण अभियानची व अॅपची जास्तीत जास्त जनजागृती करुन हा संदेश सर्व जनसामान्यापर्यंत
पोहचविण्याचे कार्य करावे,असे आवाहन केले.
०००००
Comments
Post a Comment