नगरविकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा; छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर विजेते

 



छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)-गर विकास विभागामार्फत रविवार दि.१९ व सोमवार दि.२० असे दोन दिवस विभागीय  क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धांचे उद्घाटन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.  यास्पर्धांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व नगरपरिषद ,नगरपंचायतीचे सुमारे ६०० कर्मचारी सहभागी झाले.

अंतिम विजेतेसंघ याप्रमाणे-

क्रिकेट- जालना, कबड्डी- धाराशिव, व्हॉलीबॉल- नांदेड, रिले ४x४०० मी. (पुरुष)- छत्रपती संभाजीनगर, रिले ४x१०० मी. (पुरुष)- नांदेड, रिले ४x१०० मी. (महिला)-छत्रपती संभाजीनगर, रस्सीखेच (पुरुष)- लातूर, रस्सीखेच (महिला)- छत्रपती संभाजीनगर.

स्पर्धेनंतर विजेत्यांना सह आयुक्त देविदास टेकाळी, सहा. आयुक्त संजय केदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा