जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ अद्यावत;भेट देण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर ,दि. २९(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळाचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे. आता या अद्यावत केलेल्या संकेतस्थळास भेट द्यावी,असे आवाहन जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी सुरेश थोरात यांनी केले आहे.

जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाले त्याआधीच्या नावानेच हे संकेतस्थळ होते. त्यासाठी संपूर्ण युआरएल बदलण्यात आला. आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचा नवीन युआरएल तयार करण्यात आला. नवा युआरएल https://ChhatrapatiSambhajiNagar.maharashtra.gov.in  असा आहे. या संकेतस्थळावरही बदल करण्यात आले असून त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या विविध विभागांची माहिती व जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध सेवा सुविधांच्या ऑनलाइन लिंक इ. उपलब्ध आहेत. या सर्व माहिती व ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी https://ChhatrapatiSambhajiNagar.maharashtra.gov.in हे युआरएल वापरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर जाता येणार आहे.  तरी जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक कामांसाठी व अद्यावत माहितीसाठी या संकेतस्थळाचा वापर वापर करावा, असे आवाहन जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी थोरात यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा