मराठा रेजिमेंट सेंटर युनिट कोटा अग्नीवीर भरती
छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका):- मराठा लाईट इन्फंटरी सेंटर, शिवाजी स्टेडियम येथे अग्नीवीर जनरल ड्युटी व ट्रेडमॅन यांची भरती दि.२ जानेवारी ते ८ मार्च पर्यंत करण्यात येत आहे. उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २१ वर्ष असावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा. इच्छुक माजी सैनिक पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालय सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment