जिल्हास्तरीय ‘चाचा नेहरू बाल महोत्सव’आज(दि.२)पासून
छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):- जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन गुरुवार दि.२ ते शनिवार ४ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. निरीक्षणगृह/ बालगृह, हडको कॉर्नर ,छत्रपती संभाजीनगर येथे हा बाल महोत्सव सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. शासकीय आणि स्वयंसेवी बालगृहातील बालकांच्या कला व सूप्त गुणांना वाव मिळाव्वा यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाचे उद्घाटनास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिकांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन घ्यावे असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती रेशमा चीमंद्रे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment