ओबीसी महामंडळाची थकीत व्याज दरात सवलत योजना

 छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका) – ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणात संपूर्ण थकित कर्ज रक्कमेचा एक रकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकित व्याज रक्कमेत (५०% सुट) सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना दि.३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत आहे त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी योजनेचा फायदा घेऊन कर्ज मुक्त व्हावे,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे.झेङ राठोड यांनी केले आहे.

        महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांचे जिल्हा कार्यालय, यांचे मार्फत विविध कर्ज योजनेतंर्गत जिल्ह्यातील इतर मागास प्रर्वगातील लाभर्थ्यांना स्वयंरोजगारकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत केले आहे. जिल्हा कार्यालयाकडून वाटप झालेल्या थकीत लाभार्थ्यांना महामंडळाकडून थकीत व्याज दरात (५०% सुट) सवलत दि.३१ मार्च २०२५ पर्यंत देण्यात येणार आहे. या एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घेऊन सर्व संबंधित लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कमेचा भरणा करुन कर्ज खाते बंद करण्यासाठी जिल्हा कार्यालय, जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपूरा, येथे भेट द्यावी अथवा दुरध्वनी क्रमांक ०२४०-२३४१५४४ वर संपर्क करण्याचे आवाहन‍ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. जिल्हा व्यवस्थापक जे.झेङ राठोड यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा