नवतेजस्विनी योजना जिल्हा सल्लागार समिती बैठक; महिलांच्या स्वयंरोजगाराला चालना द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका)- महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या शेळी पालन. जीवामृत, दुग्धव्यवसाय, पनीर तयार करणे, मदर पोल्ट्री अशा व्यवसायांना येत्या मार्च अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षात पूर्ण  कार्यान्वित करा. महिलांच्या स्वयंरोजगाराला चालना द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत जिल्हा सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हासमन्वयक चंदनसिंग राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्रीमती सुवर्णा जाधव, महिला बालविकास अधिकारी श्रीमती रेश्मा चिमंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत माहिती देण्यात आली की, महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जिल्ह्यात डिसेंबर २०२४ अखेर १८७ गावांमध्ये ३९६९ महिला बचत गट असून त्याद्वारे ४० हजार ८०३ महिला जोडल्या गेल्या आहेत. या नवतेजस्विनी महिलांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी चालना देण्यात येत असून त्यात शेळीपालन, जीवामृत तयार करणे, दुग्ध व्यवसाय व पनीर उद्योग, मदर पोल्ट्री युनिट अशा विविध व्यवसायांचा समावेश आहे. त्यांतर्ग जिल्ह्यात सहा सुधारीत शेळीपालन व शेळी खरेदी विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत.  

त्यात वडोदबाजार ता.फुलंब्री, रघुनाथ नगर ता. गंगापूर, शेरेगाव-लासूर स्टेशन, बिडकीन ता.पैठण, ब्रह्मगव्हाण, आन्वी ता. सिल्लोड  यांचा समावेश असून त्यात १६ गावांमधील ६०० महिलांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी ९० लक्ष रुपये निधी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीकडून १ कोटी ५ लक्ष ७२ हजार रुपये लाभार्थी हिस्सा, २ कोटी ७० लक्ष रुपये बॅंकेकडून कर्जस्वरुपात, अभिसरणातून ५ लख ७० हजार रुपये, केंद्रीय नियंत्रण कक्षाकडून २५लाख २० हजार रुपये असे एकूण ४ कोटी ९६ लक्ष ६२ हजार रुपये निधी प्राप्त झाला असून शेळ्यांसाठी निवारा संमतीपत्र, विक्री युनिट करीता जागा असे विविध टप्पे पार पडले आहेत.

त्याच प्रमाणे बुट्टेवडगाव व डोनगाव या क्षेत्रातील चार गावांमध्ये २०० महिला जीवामृत व द्रव युनिट बनवित आहेत. त्यासाठी १९ लक्ष ९० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच आगामी वर्षासाठी जिल्ह्यातील ५७८ गटांसाठी २७ कोटी ६५ लक्ष ९८ हजार रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. तसेच १७० गावांमध्ये १२६७ महिला बचत गट सदस्य महिलांना १ कोटी ९० लाख ५हजार रुपये इतके अर्थसहाय्य विविध व्यवसायासाठी वितरीत करण्यात आले आहे,अशी माहिती देण्यात आली,

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा