मिनी ट्रॅक्टर साठी बचतगटांना अर्ज करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)-सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येते. योजनेअंतर्गत ३ लाख ५० हजार रुपये मर्यादेत मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ९०% अनुदान देण्यात येते. उर्वरित १० % रक्कम संबंधित बचत गटाने भरावयाचे आहे.
योजनेच्या
लाभ मिळण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे
१. अनुसूचित
जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे
रहिवासी असावेत.
२. स्वयंसहाय्यता
बचत गटातील सर्व सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत.
३. स्वयंहाय्यता
बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत.
४. मिनी
ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार रुपये इतकी
राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा
प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या १०% स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या ९०
% अनुदान अनुज्ञेय राहील.
५. लाभार्थी
स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान ९ ते १८
अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल
मात्र त्याची
या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदानापेक्षा जास्तीची रक्कम संबंधित बचतगटाने
स्वत: खर्च करणे आवश्यक राहील.
इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या इच्छूक
स्वयंसहाय्यता बचतगटांनी आवश्यक कागदपत्रांसह दि.३१ जानेवारी २०२५ पूर्वी सहायक
आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज करावेत तसेच अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त
समाजकल्याण प्रदीप वेणू मुरलीधर भोगले यांनी आवाहन करण्यात यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment