रास्त भाव दुकानासाठी अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका):- रास्तभाव, शिधावाटप दुकानाचे परवाने मंजुर करण्याकरीता जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले असून पंचायत, गट, संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यात पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था इ. जिल्ह्यातील ग्रामीण भागात खालीलप्रमाणे रास्त भाव दुकानाचे जाहीर प्रगटन तहसिल कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये सर्व अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत. ते याप्रमाणे-

१.       रास्त भाव दुकान क्रमांक १२२ अंगुरी बाग,छत्रपती संभाजीनगर

२.      रास्त भाव दुकान क्रमांक १२३ पोलीस कॉलनी, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर

या रास्त भाव दुकानांसाठी इच्छुक पंचायत, गट, संस्था यांनी जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून विहितनमुन्यात अर्जाची विक्री किंमत ३०० रुपये फक्त चलनाने बँकेत भरुन तहसिल कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे दि.३१ जानेवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज विक्री होतील. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे अन्न धान्य वितरण अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा