मतदान यंत्र पडताळणीबाबत राजकीय पक्षप्रतिनिधींची बैठक

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान यंत्र पडताळणीची मागणी केलेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी , उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांची  तसेच डॉ. बाळासाहेब थोरात, राजू शिंदे, नासिर सिद्धीकी, डॉ. दिनेश परदेशी आदींची यावेळी उपस्थिती होती. बैठकीत मतदान यंत्र पडताळणी, व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी वा तत्सम मागण्यांसंदर्भात निवडणूक आयोगाचीकार्यपद्धती व नियमांची माहिती देण्यात आली. तसेच या संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या विविध निकालांची माहितीही देण्यात आली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा