सिंचन योजनांची १ मार्चपासुन प्रगणना; जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांचे ‘वाल्मि’त प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका)- येत्या १ मार्च पासून राज्यात सिंचन योजनांची प्रगणना सुरु होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे दि.२० व २१ रोजी पार पडले.
केंद्रशासनाकडून नव्याने
सुरु होणाऱ्या लघु सिंचन योजनांची ७ वी प्रगणना व जलसाठा योजनांची दुसरी व मोठ्या;मध्यम
प्रकल्पांच्या पहिल्या प्रगणनेसाठी हे राज्यस्तरीय प्रशिक्षण होते. राज्य प्रगणना आयुक्त तथा आयुक्त
मृद व जलसंधारण विभाग प्रकाश खपले यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात निर्मित सिंचन
क्षमता व पाण्याचा वापर याबाबतची निश्चित माहिती गोळा करणे,दीर्घकालीन व अल्पकालीन
सिंचन योजनांच्या आखणीसाठी नियोजन करणे, भूजल पाणीसाठ्याच्या उपलब्धतेबाबत अंदाज वर्तविणे, जल योजनांबाबत भविष्यात धोरण निश्चित करणे
हे होते. या प्रशिक्षणात राज्यातील मृद व जलसंधारण विभाग व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ
अधिकारी उपस्थित होते. जलशक्ती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी श्रीमती प्रियंका कुलश्रेष्ठा
व अजय बक्षी यांनी उपस्थितांना दुरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. प्रादेशिक जलसंधारण
अधिकारी हरीभाऊ गिते, दिलीप निपाणे, सहसंचालक श्रीमती मृनालिनी भूत यांनी उपस्थितांना
मार्गदर्शन केले. या प्रगणनेमध्ये राज्यातील सर्व लघु सिंचन योजनांची जलसाठ्याची व
मध्यम मोठ्या प्रकल्पाची तसेच झऱ्यांची मोबाईल ॲप व वेब पोर्टलद्वारे प्रगणना होणार
आहे. प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी अप्पर आयुक्त तथा नोडल अधिकारी (प्रगणना) नितीन दुसाने
मृद व जलसंधारण विभाग यांच्या मार्गदर्शानाखाली सांख्यिकी कक्षातील अधिकारी व कर्मचारी
तसेच आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
आता सर्व जिल्हा जलसंधारण
अधिकारी हे आपापल्या जिल्हा कार्यक्षेत्रात जाऊन तेथील प्रगणकांना प्रशिक्षित करतील,असे
नितीन दुसाने यांनी सांगितले.
०००००
Comments
Post a Comment