संक्रांतपर्वात बचतगटाच्या महिलांचे दानाचे वाण; सैनिक कल्याण निधीसाठी १० हजार रुपयांचे योगदान

 



छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका)- महिला बचत गटातील महिलांनी आपले दातृत्व दाखवित सैनिक कल्याण निधीसाठी १० हजार रुपयांचे योगदान दिले आहे. सैनिक कल्याणासाठी योगदान देऊन महिलांनी संक्रांत पर्वात दानाचे वाण लुटले आहे. सैनिक कल्याण निधीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे या महिलांनी आज धनादेश सुपूर्द केला.

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत कार्यरत लोक संचलित साधन केंद्राअंतर्गत काम करणाऱ्या महिला बचत गटाच्या सदस्य महिलांनी १० हजार रुपयांचे आपले योगदान  सैनिक कल्याण निधीस दिले. प्रगती लोकसंचलित साधन केंद्र लासूर स्टेशन, सावित्रीबाई लोकसंचलित साधन केंद्र, वाळूज, तेजस्विनी लोकसंचलित साधन केंद्र, गंगापूर, एकता लोकसंचलित साधन केंद्र, पैठण च्या संलग्न बचत गटातील महिलांनी प्रत्येक केंद्रामार्फत अडीच हजार रुपये असे एकूण १० हजार रुपये धनादेशाद्वारे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या महिलांच्या दातृत्वाचे कौतुक केले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हासमन्वयक चंदनसिंग राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्रीमती सुवर्णा जाधव, महिला बालविकास अधिकारी श्रीमती रेश्मा चिमंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा