पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मंगळवारी(दि.२८)

     छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंगळवार दि.२८ रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती बसस्टँड रोड, मालजीपूरा येथे सकाळी साडेनऊ वा. मेळावा होणार असून  जिल्ह्यतील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. त्यात मेटलमन ऑटो प्रा.लि., औरंगाबाद ॲटो ॲन्सिलरी प्रा.लि., कॉस्मो फिल्मस लि, संजीव ॲटो पार्टस मोटर प्रा.लि, फोर्ब्स प्रेसीशन टुल्स ॲड मशिन पार्टस लि, लिभेर अप्लायन्सेस प्रा.लि, अलंकार ग्रूप, ग्रीव्हज कॉटन प्रा.लि, पॅरासन मशिनरी इ.प्रा.लि, मराठवाडा ॲटो कॉम्पो प्रा.लि, मायलन लॅबोरेटरी लि इ. यात सहभागी होणार आहेत.  इंजिनिअरिंग, डिप्लोमा, आयटीआय, एचएससी, एस एस सी उत्तीर्ण इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी  विविध प्रकारची ३७८ पदे उपलब्ध असून पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना रोजगार नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड लॉग  इन होऊन ऑनलाईन अर्ज करुन मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अर्ज करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२४०- २९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र एस. आर. वराडे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा