गटई स्टॉल मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)-सहायक आयुक्त समाजकल्याण या कार्यालयामार्फत अनुसूचित जातीतील बांधवाचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी गटई स्टॉल ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील गटई कामगारांना १००% अनुदानावर गटई पत्र्याचे स्टॉल पुरविले जातात.

अटी व शर्तीः-

१.अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.

२. अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी ४० हजार व शहरी भागात ५० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे.

३.      अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे.

४.    अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोनमेंट बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वमालकीची असावी.

इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रासंह दि.३१ जानेवारी २०२५ पूर्वी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयास संपर्क साधवा असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण प्रदीप वेणू मुरलीधर भोगले यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा