डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान; १४ हजार लाभार्थ्यांना १२५ लक्ष रुपयांचा झाला लाभ

 छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सन २०२४-२५या आर्थिक वर्षामध्ये १४ हजार ४०२ लाभार्थ्यांना एकूण रक्कम १२५ लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला आहे,अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली आहे.

            शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाची विहीत मुदतीत पूर्णत: परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही पीक उत्पादन प्रोत्साहान योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत तीन लक्ष रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीच्या पीक कर्जाची विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३% व्याज सवलत लागू करण्यात आली आहे. निकषानुसार घेतलेल्या पीक कर्जाची विहीत मुदतीत मुद्दल व व्याजासह पूर्णत: परतफेड करणारे शेतकरी या योजनेस पात्र ठरतात.

            सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये १४ हजार ४०२ लाभार्थ्यांना एकूण रक्कम १२५ लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. तरी शेतकऱ्यांनी  डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने संबधी अधिक माहितीसाठी आपल्या बँक शाखेशी तसेच आपले तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन  जिल्हा उपनिबंधक डॉ.मुकेश बाराहाते यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा