अनोळखी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)-येथील कॅन्सर रुग्णालयाजवळ एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यास शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याबाबत सिटी चौक पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मयताचे वर्णन या प्रमाणे- वय अंदाजे ६० ते ६४ वर्षे, रंग सावळा, उंची ५ फुट, दाडी काळी पांढरी वाढलेली. अंगावर हिरवट पांढरे पट्टे असलेली निकर, सडपातळ  बांधा, उजव्या हाताच्या पंजावर सुर्या सारखे गोंदलेले. या मयताविषयी कोणास काहीही माहिती असल्यास सिटी चौक पोलीस स्टेशनचे हवलदार एस.एसन.आहेरकर यांच्याशी ८०८०५३३९९० वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा