जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिन सोमवारी (दि.२० रोजी)

 छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या  तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दि.२० रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु इच्छिणाऱ्या महिलांनी आपली तक्रार दोन प्रती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे दाखल करण्यात यावे असे आवाहन करण्यात येते.

अर्ज स्विकृतीचे निकष

१.    तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावेत.

२.   तक्रार / निवेदन दोन प्रतीत सादर करावेत.

३.   प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे.

४.   अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा.

५.   सेवा व आस्थपना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत.

महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा