विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना आधार अद्यावतीकरणाचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका) – संजय गांधी निराधार योजना शहर विभाग अंतर्गत विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्याचे अनुदान त्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी आधार कार्डाचे अद्यावतीकरण करणे आवश्यक असून लाभार्थ्यांनी ते त्वरीत करावे,असे आवाहन प्रभारी तहसिलदार उत्तम बहुरे यांनी केले आहे.

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा विशेष सहाय्य योजनांचे डिसेंबर २०२४ पासून पुढील महिन्यांचे अनुदान थेट डीबीटीद्वारे जमा होणार आहे. त्यासाठी आधार कार्ड हे डीबीटी प्रणालीत अद्यावत करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत  एकूण १४ हजार ९०५ लाभार्थ्यांपैकी १४ हजार ४९७ लाभार्थ्यांनी आपली माहिती नोंदविली आहे. या नोंदवलेल्या १४ हजार ४९७ लाभार्थ्यांपैकी  १० हजार २०४ लाभार्थ्यांचे आधार अद्यावतीकरण झाले आहे.  उर्वरित ४२९३ लाभार्थ्यांनी आपले आधार अद्यावतीकरण केले नसल्याने त्यांना अनुदान प्रदान करणे शक्य होणार नाही. ज्या लाभार्थ्यांचे आधार अद्यावतीकरण बाकी आहे त्यांनी ते त्वरीत करुन घ्यावे. त्यासाठी आपले आधार कार्ड व संलग्नित  मोबाईल व्यक्तिशः घेऊन यावे,असे आवाहन प्रभारी तहसिलदार उत्तम बहुरे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा