प्रजासत्ताक दिनःमुख्य शासकीय सोहळा देवगिरी मैदानावर
छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका) – देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन समारंभाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी या मैदानावर रविवार दि.२६ रोजी सकाळी सव्वा नऊ वा. आयोजीत करण्यात आला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या कार्यक्रमास सर्व स्वातंत्र्यसेनानी, लोकप्रतिनिधी, अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
मुख्य
शासकीय समारंभात लोकांना सहभागी होता यावे यासाठी सकाळी साडेआठ ते दहा यावेळात ध्वजारोहणाचा
इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ
आयोजीत करण्यात येऊ नये. त्यांनी हे समारंभ सकाळी साडेआठ पूर्वी किंवा १० वाजेनंतर
करावे,असे अपर आयुक्त सामान्य प्रशासन डॉ. अरविंद लोखंडे यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment